जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी; बीडच्या पाटोदा तालुक्यातील प्रकार

बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

    बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड शहरांतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमकं गोळीबाराच कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर बीड जिल्ह्यात पहिलाच गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.