कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा; राज्यात प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वाधिक

अल्पवयीन तसेच पौगंडावस्थेतील लाभार्थींच्या तुलनेत प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वात अधिक असल्याची माहिती प्रतिबंधक विभागाचे अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.

  • अल्पवयीन लाभार्थींचे प्रमाण ९० टक्के

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. १२ वर्षांवरील ९० टक्के लाभार्थींना कोरोना प्रतिबंधक लसीची (Corona Vaccine) पहिली मात्रा (First Dose) देण्यात आली आहे. तर ७५ टक्के लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा (Second Dose) देण्यात आली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. अल्पवयीन तसेच पौगंडावस्थेतील लाभार्थींच्या तुलनेत प्रौढ लाभार्थींचे प्रमाण सर्वात अधिक असल्याची माहिती प्रतिबंधक विभागाचे अधिकारी डॉ. सचिन देसाई (Dr. Sachin Desai) यांनी दिली आहे.

पुणे, नागपुरात सर्वाधिक संक्रमित दर

कोरोनाबाधित होण्याचा दर मुंबईतील दर ५.३ टक्के इतका आहे.

पुणे आणि नागपूरमधील हाच दर १४ टक्के इतका आहे. राज्यातील हा सर्वात जास्त संक्रमित दर आहे.

मोफत लसीसाठी धाव

१० एप्रिल ते १४ जुलै या कालावधीत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ८ लाख १० हजार लाभार्थींनी खासगी रुग्णालयात शुल्क भरून वर्धक मात्रा घेतली. मात्र, १५ जुलैपासून ३० सप्टेंबर या कालावधीत १८ ते ५९ वर्षे वयोगटातील लाभार्थींना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा मोफत दिली जाणार आहे. वर्धक मात्रा मोफत देण्याची घोषणा केल्यानंतर वर्धक मात्रा घेणाऱ्यांची संख्या १ ऑगस्टपर्यंत २२ लाखांपर्यंत पोहोचली. पहिली मात्रा न घेतलेल्यांसाठी अद्यापही वेळ गेलेली नाही. अशांनी पुढाकार घेण्याचे आवाहन राज्य कोरोना कृती दलाच्या सदस्यांनी सांगितले.

लस मात्रा

१७ कोटी ३० लाख मात्रा जानेवारी २०२१ पासून दिल्या.
७ कोटी ५० लाख दुसरी मात्रा.
६३ लाख ९ हजार वर्धक मात्रा.
२२ लाख ४६ हजार वर्धक मात्रा १५ जुलै ते १ ऑगस्टदरम्यान दिल्या.