Knock 99 Cup' Championship Under-19 T20 Cricket Tournament
Knock 99 Cup' Championship Under-19 T20 Cricket Tournament,

  पुणे : क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘नॉक ९९ करंडक’ अजिंक्यपद १९ वर्षांखालील टी-२० क्रिकेट स्पर्धेत गौरव खैरे याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सेन्चुरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाने ब्रिलीयन्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.
  या खेळाडूंकडून दर्जेदार कामगिरी
  कटारिया हायस्कूल मैदान, मुकुंदनगर येथे झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयन्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीने ११४ धावा धावफलकावर लावल्या. रौनक दुबे याने ५६ धावांची खेळी केली. गणेश बाड याने २३ धावांची खेळी करून संघाचा डाव सावरला. गौरव खैरे याने १२ धावांत ३ गडी बाद केले. केदार बजाज आणि हर्ष सी. यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. हे आव्हान सेन्चुरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १६.१ षटकामध्ये व ५ गडी गमावून पूर्ण केले. नील गांधी (नाबाद ३७ धावा) आणि पार्थ देवोकर (३२ धावा) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजजेतेपद मिळवून दिले.
  यांना पारितोषिक देऊन गौरवान्वित
  या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी स्पर्धेचे संचालक आणि संयोजक विक्रम देशमुख, संघांचे प्रशिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते. विजेत्या सेन्चुरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि उपविजेत्या ब्रिलीयन्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीला करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरव खैरे याला गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ऋत्विक रडे आणि सवोत्कृष्ट गोलंदाज म्हणून राहूल वाजंत्री यांना पारितोषिक देण्यात आले.
  सामन्याचा संक्षिप्त धावफलक : अंतिम फेरी :
  ब्रिलीयन्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद ११४ धावा (रौनक दुबे ५६ (५२, ३ चौकार, ३ षटकार), गणेश बाड २३, गौरव खैरे ३-१२, केदार बजाज २-१०, हर्ष सी. २-२६) पराभूत वि. सेन्चुरी क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १६.१ षटकात ५ गडी बाद ११६ धावा (नील गांधी नाबाद ३७, पार्थ देवोकर ३२, आदित्य लोखंडे १-४); सामनावीरः गौरव खैरे;
  वैयक्तिक पारितोषिके : 
  सर्वोत्कृष्ट खेळाडूः गौरव खैरे (सेन्चुरी क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ७४ धावा, १२ विकेट);
  सर्वोत्कृष्ट फलंदाजः ऋत्विक रडे (आर्यन्स् क्रिकेट अ‍ॅकॅडमी, २३८ धावा);
  सवोत्कृष्ट गोलंदाजः राहुल वाजंत्री (ब्रिलीयन्ट्स क्रिकेट अ‍ॅकॅडमी, १४ विकेट).