आजपासून मासळीचा हंगाम सुरू; खोल समुद्रात मासेमारीसाठी बोटी सज्ज

दोन महिन्यांपासून बोटी किनाऱ्याला साकारून ठेवण्यात आल्या होत्या. आता या बोटींवरील आच्छादलेले ताडपत्री काढण्यात आली असून, बोटीचे इंजिन, रंगरंगोटी, बोटींची पडताळणी, मशीनची परिस्थतीत या सर्व पडताळून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता बोटी खोल पाण्यात मासेमारीसाठी जाणार आहेत.

  मुरुड जंजिरा : मुरुड (Murud) तालुक्यासह मुंबई (Mumbai), कोकणात मासळीचा हंगाम (Fishing Season) सुरु झाला आहे. १ जून ते ३१ जुलै हा मासेमारी बंदीचा (Fishing Ban) कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार (Fisherman) तयार झाले असून मोठ्या अपेक्षेने नवीन हंगामाची सुरुवात करीत आहेत.

  दोन महिन्यांपासून बोटी किनाऱ्याला साकारून ठेवण्यात आल्या होत्या. आता या बोटींवरील आच्छादलेले ताडपत्री काढण्यात आली असून, बोटीचे इंजिन, रंगरंगोटी, बोटींची पडताळणी, मशीनची परिस्थतीत या सर्व पडताळून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता बोटी खोल पाण्यात मासेमारीसाठी जाणार आहेत.

  मागील काळ मासेमारीसाठी उपयुक्त नव्हता. कारण या काळात मासेच जास्त न मिळाल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. ऐन मे महिन्यात माश्यांची आवक घटली होती. त्यामुळे मे महिन्यातच बोटी किनाऱ्याला साकारून ठेवण्यात आलेल्या होत्या. यंदाचा १ ऑगस्टपासून होणारा माशांचा हंगाम चांगला जावा या अपेक्षेने मच्छीमार नव्या दमाने खोल समुद्रात जाताना दिसत आहेत.

  दोन वर्षांपासून मत्स्यदुष्काळ
  मच्छीमार मागील दोन वर्षांपासून मुबलक मासळी न मिळाल्यामुळे कर्जाचा बोजासुद्धा वाढला (Increase Debt) आहे. श्रावण महिना सुरू झाला की, पापलेट (Paplet) ही चविष्ठ मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असते. मासेमारांना जर पापलेट मोठ्या प्रमाणात मिळाले तर खूप मोठा आर्थिक फायदा मिळून कर्ज कमी होण्यास मदत मिळणार आहे. पापलेट मासळीला खूप चांगला भावसुद्धा मिळत असतो.

  समुद्र शांत असल्याने आशा पल्लवित
  रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, मासळीचा हंगाम सुरू झाला असून समुद्र खूप शांत आहे. समुद्र शांत राहिला तर मासेमारी व्यवस्थित करता येऊन मुबलक मासळी मिळणार आहे. या महिन्यात समुद्र हा खवळलेला असतो, परंतु सध्या समुद्र शांत आहे. थोडी भीतीसुद्धा मच्छीमारांमध्ये आढळून येते. अचानकपणे समुद्रात वादळ निर्माण होऊ शकते.