मदरशातील शिक्षकांच्या जाचाला कंटाळून पाच मुलांनी घेतला पळून जाण्याचा निर्णय, पुढे काय झालं वाचा

मदरशामध्ये शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांनी शिक्षकांच्या (Teachers) जाचाला कंटाळून बिहारला आपल्या गावी (Bihar) जाण्याचा प्रयत्न केला. डोंबिवली जीआरपीने (Dombivali GRP) या प्रकरणी मदरशामधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करत गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. 

    डोंबिवली : मदरशामध्ये शिकणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांनी शिक्षकांच्या (Teachers) जाचाला कंटाळून बिहारला आपल्या गावी (Bihar) जाण्याचा प्रयत्न केला. कळव्याहून कल्याणच्या दिशेने ट्रेनने प्रवास करत असताना एका महिलेने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना (Railway Police) दिली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी डोंबिवली (Dombivli) रेल्वे स्थानकात या मुलांची चौकशी केली. त्यांची रवानगी उल्हासनगरमधील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

    डोंबिवली जीआरपीने (Dombivali GRP) या प्रकरणी मदरशामधील दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करत गुन्हा कळवा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी एका ट्रेनमध्ये बसून पाच अल्पवयीन मुलं बिहारला चालली होती. मात्र लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेने या मुलांना बघितलं. त्यांची कशाबद्दल चर्चा सुरु आहे ते ऐकलं आणि त्यांच्या चर्चेवरुन संशय आल्याने महिलेने तात्काळ रेल्वे पोलिसांना फोन करत याबाबत माहिती दिली. डोंबिवली जीआरपीने या पाचही मुलांना डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकात उतरवलं.

    पोलिसांनी विचारपूस केली तेव्हा ही सर्व मुलं बिहार येथील असून त्यांना पुन्हा बिहारला जायचे होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षण घेण्यासाठी कळवा येथील मदरशात पाठवलं होतं. मात्र त्या मदरशामध्ये शिक्षकांकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. त्यामुळे मुलांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे पोलिसांनी या मुलांना चाईल्ड वेल्फेर कमिटीसमोर हजर करण्यात आले. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात मदरशाच्या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.