भीमा कोरेगाव प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाचा झटका, पाच आरोपींचे डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळले

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावामध्ये (Bheema Koregaon Case) हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळे आरोपी शिक्षणतज्ज्ञ सुधीर ढवले, रोना विल्सन, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत,शोभा सेन यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून पाचही आरोपी विविध कारागृहात आहेत.

    मुंबई: भीमा कोरेगाव (Bheema Koregaon Case) आणि एल्गार परिषद (Elgar Parishad) प्रकरणीतील आरोपी विशेष एनआयए न्यायालयाने (NIA Court) आरोपी शिक्षणतज्ज्ञ सुधीर ढवळे, रोना विल्सन, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, शोभा सेन या पाचही आरोपींचे डिफॉल्ट जामीन अर्ज (Bail Application Rejected) मुंबई सत्र न्यायालयातील (Mumbai Session Court) विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावले.

    पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळे आरोपी शिक्षणतज्ज्ञ सुधीर ढवले, रोना विल्सन, वकील सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत,शोभा सेन यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून पाचही आरोपी विविध कारागृहात आहेत.

    पुणे पोलिसांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपपत्र दाखल केल्यानंतर जानेवारी २०२० मध्ये राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे(एनआयए)कडे तपास हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर एनआयएने ९० दिवासात आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक असतानाही अद्याप दाखल केलेले नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता(सीआरपीसी) अंतर्गत डिफॉल्ट जामीन मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे. असा दावा करत या आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयात डिफॉल्ट जामीन अर्ज केला होता. तो अर्ज मंगळवारी विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.