5g spectrum auction

मागील वर्षापासून मोबाईल कंपन्या फाय-जी (५-जी) (5-G) सेवा बाजारात आणणार असं म्हणत आहेत. याप्रमाणे फाय-जी (५-जी) मोबाईल सुद्धा मार्केटमध्ये विकले जात आहेत, पण फाय-जी (५-जी) सेवा अद्यापर्यंत आली नव्हती. मात्र आता या महिन्याचा अखेरपर्यंत भारती एअरटेल (Bharati Airtel) ही कंपनी फाय-जी (५-जी) सेवा आणणार आहे.

    मुंबई : सध्या मोबाईचे (mobile) युग आहे, एकवेळ जेवण नसेल तर चालेल, पण हाती मोबाईल हवा, मोबाईल हे जगण्याचे साधन झाले आहे. पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा ही जगण्याची मूलभूत गरज होती. मात्र आता यात आणखी एक भर पडली आहे, ती म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. दरम्यान आता मोबाईल ग्राहकांसाठी (mobile customer) तसेच जे इंटरनेटचा (Internet)` वापर मोठ्या प्रमाणात करतात. व ज्यांना इंटरनेटचा वापर अधिक जलदगतीनं हवा असतो. त्याच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

    दरम्यान, मागील वर्षापासून मोबाईल कंपन्या फाय-जी (५-जी) (5-G) सेवा बाजारात आणणार असं म्हणत आहेत. याप्रमाणे फाय-जी (५-जी) मोबाईल सुद्धा मार्केटमध्ये विकले जात आहेत, पण फाय-जी (५-जी) सेवा अद्यापर्यंत आली नव्हती. मात्र आता या महिन्याचा अखेरपर्यंत भारती एअरटेल (Bharati Airtel) ही कंपनी फाय-जी (५-जी) सेवा आणणार आहे. त्यामुळं ग्राहकाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत फाय-जी (५-जी) बाजारात आणणार असल्याचं भारती एअरटेल कंपनीनं एक परिपत्रक काढत माहिती दिली आहे, तसेच एअरटेलच्या अधिकृत ट्विटवरुन सुद्धा ही माहिती दिली गेली आहे.