गणेशोत्सवाच्या तोंडावर बुलढाण्यात पाच तलवारी जप्त; तीन जणांना अटक

बुलढाणा (buldhana) येथुन अजिंठाकडे जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच २८ टी १४६० हॉटेलजवळ थांबवून कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींकडून ५ तलवारी आणि १ ऑटो व २ मोबाईल असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    बुलढाणा : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बुलढाण्याहून (Buldhana Crime) ऑटोमध्ये अजिंठा रोडकडे पाच तलवारी घेऊन जात असताना तीन जणांना अटक (arrest) केली आहे. शेख परवेज शेख शकील, सैय्यद समीर सैय्यद युसुफ आणि सैय्यद साकिब सैय्यद अलिम अशी अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. यांच्याकडून पाच तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.

    बुलढाणा येथुन अजिंठाकडे जात असलेल्या ऑटो क्रमांक एमएच २८ टी १४६० हॉटेलजवळ थांबवून कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या आरोपींकडून ५ तलवारी आणि १ ऑटो व २ मोबाईल असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींच्याविरोधात विश्रामबाग बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गणेश उत्सवाच्या तोंडावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ही मोठी कारवाई केली आहे.