
या नोंदणीनुसार क्रीडा महोत्सवात सुमारे ५ हजार खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात खेळाच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे.
गोंदिया : स्थानिक आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोंदिया विधानसभा जनता की पार्टी चाबी संघठन तर्फे क्रीडा संकुल गोंदिया येथे “आमदार क्रीडा महोत्सव” च्या माध्यमातून १ जून ते ५ जून पर्यंत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये विविध खेळासाठी सुमारे ५ हजार खेळाडू या क्रिडा महोत्सवात सहभागी होणार आहेत. तेव्हा गोंदिया शहरात एक प्रकारे खेळाडूंची जत्राच भरणार आहे.
आमदार विनोद अग्रवाल यांचा ४ जून रोजी वाढदिवस असून या निमीत्ताने जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये १ जून रोजी शॉर्टपुट (महिला आणि पुरुष), १०० मीटर (महिला आणि पुरुष), १६०० मीटर (पुरुष), २ जून रोजी ८०० मीटर (महिला), ३ जून रोजी कबड्डी (पुरुष), सायक्लोथॉन होणार आहेत. ५ जून – महिला आणि पुरुष (१५ वर्षांवरील) खेळाचे स्वरूप अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली असताना ती नि:शुल्क ठेवण्यात आली होती.
या सोबतच नोंदणीसाठी ऑनलाइन लिंकही देण्यात आली होती, दरम्यान, या नोंदणीनुसार क्रीडा महोत्सवात सुमारे ५ हजार खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आमदार विनोद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात खेळाच्या माध्यमातून खेळाडूंच्या कलागुणांना उजाळा देण्याची संधी मिळणार आहे. खेळाच्या माध्यमातून अनेक खेळाडू उदयास येतील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक तरुण पोलीस भरती, सैन्य भरतीची तयारी करतात, त्यांना या उपक्रमातून प्रोत्साहन मिळणार आहे.
या सोबतच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषणावर नियंत्रण ठेवता यावा, असा संदेश देण्यासाठी सायक्लोथॉनचेही आयोजन करण्यात आले आहे. सायक्लोथॉन मधून लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल, जेणेकरून लोक पर्यावरणातील नैसर्गिकतेचा समतोल राखण्यासाठी पावले उचलतील, असा विश्वास व्यक्त करून नागरिकांनी या क्रिडा महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक समीर आरेकर, अजित टेंभरे व शेखर सहारे यांनी केले आहे.
@vinod agrawal_@officeVA