
मुबईतील शिवाजी पार्कात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजावंदन पार पडले. तर दुसरीकडे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील संघ मुख्यालयात सालाबादप्रमाणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.
मुंबई– आज देशभरात ७४ व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिन हा दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आलेली भारतीय राज्यघटना अमंलात आली, त्याची आठवण म्हणून आज प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातंय. राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) सालाबादप्रमाणे होणाऱ्या पथसंचलनातील महाराष्ट्राचा चित्ररथ सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आज विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण केलं. तर विधान भवनात देखील ध्वजारोहण करण्यात आला आहे. ध्वजारोहन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
Maharashtra | The Tricolour unfurled at the RSS headquarters in Nagpur, on #RepublicDay
RSS Nagpur Mahanagar Sahsanghchalak Shridhar Gadge unfurled the national flag on the occasion. pic.twitter.com/pyAaKdzaZV
— ANI (@ANI) January 26, 2023
शिवाजी पार्कमध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजावंदन…
दरम्यान, मुबईतील शिवाजी पार्कात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजावंदन पार पडले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून मराठीतून भाषण केले. तसेच देशवासियांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, आपण पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस प्रगती करत असल्याचं यावेळी राज्यपालांनी आपल्या भाषणात म्हटले.
नागपुरात RSS मुख्यालयात ध्वजारोहण
तर दुसरीकडे आज ७४ वा प्रजासत्ताक दिन आहे. त्यानिमित्ताने नागपूर येथील संघ मुख्यालयात सालाबादप्रमाणे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. RSS नागपूरचे महानगरचे सहसंघचालक श्रीधर गाडगे यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.