Pune Burglary

    पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, विविध भागांतील तीन फ्लॅट फोडले आहेत. टिंगरेनगर, लोहगाव तसेच हांडेवाडी या भागात या घटना घडल्या असून, यात तब्बल ५ लाख ३६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार
    विशाल लालचंद रामानी (वय ३७, रा. आदर्श कॉलनी, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांचे राहत्या घराचा दरवाजा कुलुप लावून बंद होता. तेव्हा चोरट्याने ५० हजारांची रोकड चोरी करून नेली. हा प्रकार १८ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान घडला. दुसर्‍या घटनेत विनाद खंडु अडागळे (वय ४२, रा. हिल व्ह्यु रेसीडन्सी , खंडोबा माळ, लोहगाव) यांचे घर फोडले आहे. त्यांच्या घरातून ३ लाख ७३ हजारांचे सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरी करून नेली. हा प्रकार १९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    हॉटेलच्या काउंटरमधील रोख रक्कम आठ टॅब जप्त
    हांडेवाडी येथील हॉटेल शौर्यवाड्याचे मागील बाजूस असलेल्या शटरचे लॉक तोडून चोरट्यांनी हॉटेलच्या काउंटरमधील रोख रक्कम आठ टॅब असा एकूण १ लाख १३ हजारांचा ऐवज चोरी करून नेला. याप्रकरणी राजेंद्र बाबुराव पेटकर (वय ४६, रा. पाटील प्लाझा बिल्डींग, भेकराईनगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २० नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला.