संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

आसखेडा येथे सुतळी बॉम्बमुळे (Crackers Blast) लागलेल्या आगीत चाऱ्याचा ट्रॉली भस्मसात झाला. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार यांच्यासह परिसरातील शिवबंध ग्रुपच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

    सटाणा : आसखेडा येथे सुतळी बॉम्बमुळे (Crackers Blast) लागलेल्या आगीत चाऱ्याचा ट्रॉली भस्मसात झाला. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार यांच्यासह परिसरातील शिवबंध ग्रुपच्या सदस्यांनी व ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत केलेल्या मदतीमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

    गणेश सोनू लकधीरे (रा. काडगाव, ता. चांदवड) हे आसखेडा येथे मंगळवारी (दि. १४) चारा घेण्यासाठी आले होते. दीपावलीच्या दिवशी रात्री ८ सुमारास नामपूर येथे काही नागरिकांनी रस्त्यावर सुतळी बॉम्ब लावला. त्यामुळे गणेश लकधीरे यांच्या ट्रॉलीला आग लागली. शेजारी पेट्रोल पंप व दुकाने असल्यामुळे गणेश लकधीरे यांनी तात्काळ ट्रॅक्टर भरधाव वेगात शहरातून बाहेर नेला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

    अंबासन-काकडगाव सीमेजवळ परिस्थिती हाताबाहेर गेली व पूर्ण ट्रॉलीला आग लागली. यावेळी शिवबंध ग्रुपच्या शेतकऱ्यांनी धाव घेत ट्रॉली ट्रॅक्टरपासून वेगळा करुन ट्रॉलीमधील जळणारा कडबा खाली काढला. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दलाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब पाटील व गायकवाड हजर झाले. नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार यांनी केलेल्या या मदतीबद्दल सर्व स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.