अहवाल मिळताच भरपाईसाठी पाठपुरावा करणार; सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

''गारपिटीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाच्या सर्व विभागांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने पंचनामेही सुरू झाले आहे. अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार आहे'' माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

    आंबेगाव : ”गारपिटीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाच्या सर्व विभागांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. तातडीने पंचनामेही सुरू झाले आहे. अहवाल प्राप्त होताच नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणार आहे” माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

    आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील वाळुंजनगर, रानमळा, खडकवाडी वडगावपीर, मांदळेवाडी धामणी, लोणी या परिसरात झालेल्या गारपीट व मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सहकारमंत्री वळसे पाटील यांनी या सर्व गावांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे म्हणणे एकूण घेतले.

    रानमळ्याचे सरपंच राजू सिनलकर, महेंद्र वाळुंज, बाबू आदक, अशोक आदक पाटील, उदय डोके, बाळशिराम वाळुंज, सतीश थोरात, चंद्रकांत गायकवाड, गुरुदेव पोखरकर, वामन जाधव, अशोक वाळुंज यांनी प्रातिनिधिक स्वरूपात पिकांच्या नुकसानीची माहिती सहकारमंत्र्यांना दिली.

    पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी

    शेतातील सर्वच पिकांचे नुकसान नुकसान झाले असल्याने सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी लोणीचे माजी सरपंच उद्धवराव लंके यांनी केली. वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना म्हणाले की, अगोदर या भागात पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच गारपीट झाल्याने शेतात असलेला थोडाफार हिरवा चाराही भुईसपाट झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी या भागात शासनाने चारा छावणी सुरू करावी.