मुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, मग महाराष्ट्रातील मुलांवर अन्याय का? आदित्य ठाकरे यांचे राज्य सरकारवर टिकास्त्र

वर्सोवा-वांर्दे सी-लिंकचं कामांसाठी परराज्यातून मुलांना काम का देता, महाराष्ट्रातील भूमिपुत्रासाठी काम नाहिय, आणि चेन्नईला मुलाखती घेतायेत. मुंबईतील वर्सोवा-वांर्दे सी-लिंकच्या (Versova-Wandre C-Link) कामांसाठी चेन्नईत (Chennai) मुलाखती घेतल्या गेल्या, मग महाराष्ट्रातील मुलांवर अन्याय का? असा आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल विचारत टिका केली आहे.

    मुंबई : वेदांता प्रकल्प (Vedanta project) राज्यातून गुजरातमध्ये गेल्यावर विरोधक आक्रमक होत सत्ताधांऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम करत असताना, आता नवीन एका प्रकल्पावरुन माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारवर (State government) जोरदार प्रहार केला आहे. वर्सोवा-वांर्दे सी-लिंकचं कामांसाठी परराज्यातून मुलांना काम का देता, महाराष्ट्रातील भूमिपुत्रासाठी काम नाहिय, आणि चेन्नईला मुलाखती घेतायेत. मुंबईतील वर्सोवा-वांर्दे सी-लिंकच्या (Versova-Wandre C-Link) कामांसाठी चेन्नईत (Chennai) मुलाखती घेतल्या गेल्या, मग महाराष्ट्रातील मुलांवर अन्याय का? असा आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला सवाल विचारत टिका केली आहे.

    दरम्यान, वर्सोवा-वांर्दे सी-लिंकचं कामांसाठी वेगळ्या कंत्राटदाराला काम दिलं गेलं, ते का दिलं गेलं असा प्रश्न सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे, तसेच बल्क ड्रग प्रकल्प सुद्धा राज्याबाहेर गेला आहे, त्यामुळं राज्यात काय सुरु आहे, याचे मुख्यमंत्री (CM Eknath shinde) व उद्योगमंत्र्यांना कल्पना आहे का? आमचा एअरबसच्या प्रकल्पासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे. राज्यातील अनेक कामांना सरकारने स्थगिती दिली गेली. स्थगिती दिल्यामुळं उद्योगांना फटका बसतोय. आम्हाला बदनाम करण्य़ाचे काम सुरु आहे, उद्योगमंत्र्यांना काय चाललंय माहितच नाहीय. तसेच वेदांतावर सरकारकडून अद्याप उत्तर नाहीय अशी टिका आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारवर केली.