शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे थेट जनतेशी साधणार संवाद, काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

    मुंबई : एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) थेट जनतेशी बोलणार आहेत. ते पाच वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. शिवसेनेत एवढं मोठ बंड झाल्यावर मुख्यमंत्री काय बोलणार? तसेच कोणती मोठी घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संध्याकाळी ५ वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.


    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संध्याकाळी ५.०० वाजता फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधून चालू घडामोडींबाबत आपली प्रतिक्रिया देतील, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशातच मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.