
कापसेवाडी ता माढा येथील कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता द्राक्ष , बेदाणा , टाेमॅटाे व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेन्या साठी शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरदचंद्र पवार हे स्वतः ह उपस्थित राहणार असल्याने या आधी रद्द झालेला मेळावा अखेर हाेणार आहे.
माढा : कापसेवाडी ता माढा येथील कृषीनिष्ठ परिवाराच्या वतीने गुरुवार १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता द्राक्ष , बेदाणा , टाेमॅटाे व दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जानून घेन्या साठी शेतकरी मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरदचंद्र पवार हे स्वतः ह उपस्थित राहणार असल्याने या आधी रद्द झालेला मेळावा अखेर हाेणार आहे. यामुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या समस्येवर मंथन होण्या बरोबरच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापणार आहे.
माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार गटात गेल्याने आमदार शिंदेवर पवार लक्ष साधतील का हे ही पाहणं तितकंच महत्वाच ठरणार आहे.या बाबतची माहिती मेळाव्याचे आयोजक नितीन कापसे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभ्या फुटीनंतर माढा तालुक्यात होणाऱ्या त्यांच्या पहिल्याच दौऱ्याकडे द्राक्ष व बेदाणा फळ बागायतदारां बरोबरच राजकीय नेत्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.२३ ऑक्टोंबर रोजी आयोजित केलेला येथील शेतकरी मेळावा अचानकपणे रद्द झाल्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी एका महिन्याच्या आत हा मेळावा होत असल्याने याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे .
खा.शरद पवारांचा १६ नोव्हेंबर रोजी फक्त कापसेवाडी दौरा – कापसेवाडी ता.माढा येथील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांच्या मेळाव्याला १६ नोव्हेंबर रोजी खा.शरदचंद्र पवार यांची प्रमुख उपस्थितीत राहणार असल्याचे मागील आठवड्यात जाहीर झाल्या नंतर त्यांच्या दिवसभराच्या दौऱ्यात पंढरपूर व सोलापूर येथील काही कार्यक्रम नियोजित झाले होते. परंतु त्यांच्या दौऱ्यात १२ नोव्हेंबर रोजी सकाळी बदल झाला असून फक्त कापसेवाडी ता.माढा येथील शेतकरी मेळाव्यालाच ते हेलिकॉप्टरने उपस्थित राहणार असून इतर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.