अल्पसंख्यांक वोटसाठी विरोधी पक्षाचे लोक औरंगजेबला इथला हिरो बनवण्याच राजकारण करत आहेत, भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

विरोधी पक्षाचे लोक आपल्या अल्पसंख्यांक वोट बँकसाठी हे राजकारण करत आहेत, असा स्पष्ट आरोप भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.

    बुलडाणा : महाराष्ट्र सरकार कायदा सुव्यवस्थाच्या बाबतीत तत्पर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या बाबतीत योग्य काम करत आहेत. काही लोक जर इतिहासाला तोडून मोडून औरंगजेबला (Aurangzeb) इथला हिरो बनवत असतील तर ते चुकीचं आहे. विरोधी पक्षाचे लोक आपल्या अल्पसंख्यांक वोट बँकसाठी हे राजकारण करत आहेत, असा स्पष्ट आरोप भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव (bhupendra yadav) यांनी केला, ते बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांसोबत सवांद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

    काय म्हणाले भुपेंद्र यादव

    राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याच्या आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवार हे आमच्या सगळ्यात सन्मानित नेते आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो, असे ते म्हणाले. तसेच आम्ही महाराष्टात पूर्ण 48 जागा आम्ही जिंकू, आम्ही आमच्या सहकारी पक्ष शिवसेना सोबत या जागा लढू असा आशावाद भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला

    देश हिंदू राष्ट्र कधी बनेल या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले की, भारत आपल्या संविधानच्या अनुसार चालेल आणि संविधानिक मुल्यावर देश पुढे जाईल. सत्तर वर्षात कांग्रेसने जे केला नाही ते नऊ वर्षात आम्ही केले असे म्हणत मागील नऊ वर्षात सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा त्यांनी माध्यमांसमोर मांडला.

    काँग्रेस ओबीसींच्या विरोधात

    ओबीसीं आरक्षणाबाबत विचारले असता ते म्हणाले की,  ओबीसींना जे काँग्रेसने दिले नाही, ते आमच्या सरकारने दिले आहे. कांग्रेस ही ओबीसींच्या विरोधात नेहमी राहिली आहे, मंडळ आयोग पण कांग्रेसने लागू केले नाही असा घणाघात त्यांनी केला. शिवाय सुवर्ण समाजाला पण दहा टक्के डबल्यूचे आरक्षण आमच्या सरकारनेच दिले, गरिबांना सन्मान आम्ही दिले आहे असा दावा ही भूपेंद्र यादव यांनी केला.