Winter Session 2022 : खाकीचे भोग अन् कायमच उपेक्षित! हायटेकपणा गेला चुलीत? नागपूर अधिवेशनात तैनात पोलिसांना सक्तीचा उपवास; १० दिवसांचे पैसे देऊनही अव्यवस्था

हिवाळी अधिवेशनासाठी तौनात असलेल्या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. १० दिवस २५० रुपयांत त्यांना जेवण देण्यात येणार होते. त्यासाठीची कुपन्सही पोलिसांना वाटण्यात आली होती. प्रत्यक्षात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांची व्यवस्था होऊ शकली नाही.

  नागपूर : हिवाळी अदिवेशनाच्या (Winter Session 2022) पहिल्याच दिवशी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिासांना (Police) उपाशी (Fast) राहण्याचा फटका सहन करावा लागला आहे. दिवसभर उन्हातान्हात अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी हजारो पोलिसांचा बदोबस्त १० दिवस या ठिकाणी तैनात करण्यात आलाय.

  पोलिासंसाठी जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यासाठी पोलिसांकंडून १० दिवसांच्या जेवणाचे पैसेही घेण्यात आले होते. मात्र जेवणच अपुरं अपडल्यानं अनेक पोलिसांना उपाशी राहावं लागलंय. विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या पोलिसांच्या जेवणाच्या स्टॉलवरचे अन्नच लवकर संपल्यानं अनेक पोलीस हिरमुसलेल्या अवस्थेत बसून राहिल्याचं पाहयाला मिळालं.

  १० दिवसांचे कुपन २५० रुपयांना

  हिवाळी अधिवेशनासाठी तौनात असलेल्या पोलिसांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. १० दिवस २५० रुपयांत त्यांना जेवण देण्यात येणार होते. त्यासाठीची कुपन्सही पोलिसांना वाटण्यात आली होती. प्रत्यक्षात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांची व्यवस्था होऊ शकली नाही. अन्न कमी पडल्यानं अनेक पोलिसांना सक्तीचा उपवास घडलाय.

  हिवाळी अधिवेशनासाठी मोठा बंदोबस्त

  नागपूर अदिवेशनासाठी मुंबईसह राज्यभरातून मोठा पोलीस फौजफाटा सध्या नागपुरात बोलावण्यात आलेला आहे. विधीमंडळ परिसर आणि नागपूर शहरात पोलीस बंदोबस्त आहे. राज्यभरातून सुमारे सात हजार पोलीस बंदोबस्तासाठी सध्या नागपुरात आहेत.

  काही दिवसांपूर्वीच नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समृद्धीच्या लोकार्पणासाठी दौरा पार पडला. त्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशनासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर आधीच ताम असताना, त्यांच्या भोजनाची तरी व्यवस्था नीट व्हाययला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.