जबरदस्तीने विवाह करुन शारिरीक संबंध केले प्रस्थापित; अश्लील व्हिडिओही बनवला, पुण्यातील प्रकार

जबरदस्तीने विवाहाचा आग्रह करुन शरीरसंबंध ठेवून (Physical Relationship) त्याचे अश्लिल व्हिडिओ बनविले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा (Pune Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    पुणे : जबरदस्तीने विवाहाचा आग्रह करुन शरीरसंबंध ठेवून (Physical Relationship) त्याचे अश्लिल व्हिडिओ बनविले. त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीकडून तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा (Pune Crime) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या तरुणीला घरी राहण्यासाठी जबरदस्ती देखील केली.

    याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात सौरभ सुपेकर (रा. विश्वकर्मा पद्मजी पर्ल सोसायटी, भवानी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. हा प्रकार मंगळवार पेठ, बावधन येथे डिसेबर २०२० पासून सुरु होता. दोघेही ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. सौरभने तरुणीला वेळोवेळी लग्न करण्याचा आग्रह केला. तिच्याबरोबर जबदस्तीने शरीरसंबध ठेवले. तिच्याशी ऑक्टोबर २०२१ मध्ये जबरदस्तीने रजिस्टार विवाहही केला.

    त्यानंतर तो त्यांच्या संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्याने १० लाख रुपये देखील तरुणीकडून उकळले. तिला आपल्या घरी राहण्यासाठी जबरदस्ती केली. नकार दिल्यानंतर तिच्या कुटंबियांना शिवीगाळ करुन तिचा वेळोवेळी पाठलाग केला.