मग आमच्या पदव्यांचा काय अर्थ…सुशांतबद्दलच्या शवागारातील कर्मचार्‍याच्या विधानावर फॉरेन्सिक तज्ञांची सतंप्त प्रतिक्रिया

रूपकुमार शाह यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा ते ड्युटीवर होते, असे. मृतदेह पाहिल्यावर त्याच्या मानेवर लटकल्याची खूण होती, मात्र ती आत्महत्या असल्याचे दिसत नव्हते.

  मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर आधीच मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे आता बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh) मृत्यू प्रकरणात नवं वळणं लागलय. ज्या हॉस्पिटलमध्ये सुशांत सिंग राजपूतचं  शवविच्छेदन झालं, त्या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी अभिनेत्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला. सुशांतने आत्महत्या केली नसून, त्याची हत्या करण्यात आली आहे. असा कूपर हॉस्पिटलचे शवागारातील कर्मचारी रुपकुमार शाह यांचा दावा आहे. 

  सुशांतच्या मानेवर, शरीरावर अनेक खुणा होत्या

  सुशांतच्या मृत्यूच्या दोन वर्षांनंतर, रूपकुमार शाह यांनी दावा केला की सुशांत सिंग राजपूतच्या शरीरावर आणि मानेवर अनेक खुणा होत्या. आता रूपकुमार शाह यांच्या या दाव्यानंतर सर्व फॉरेन्सिक तज्ज्ञांनी  नाराजी व्यक्त केली.  रुग्णालयातील कर्मचारी एवढेच जाणकार असतील तर डॉक्टर आणि त्यांच्या पदवीचा उपयोग काय? अशी संतप्त प्रतिक्रियी त्यांनी दिली आहे.

  अभिनेत्याला मारण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती- रूपकुमार शाह

  रूपकुमार शाह यांनी सांगितले की, सुशांतचा मृतदेह रुग्णालयात आणला तेव्हा ते ड्युटीवर होते, असे. मृतदेह पाहिल्यावर त्याच्या मानेवर लटकल्याची खूण होती, मात्र ती आत्महत्या असल्याचे दिसत नव्हते. रूपकुमारच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या मानेवर खेचल्यानंतर वेदना झालेल्या व्यक्तीच्या मानेवर खुणा झाल्यासारखी खूण होती. याशिवाय पाय, हात आणि शरीराच्या विविध भागांवर अनेक प्रकारच्या खुणा दिसून आल्या. सुशांतला मारण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. त्याला ती खूण फ्रॅक्चरसारखी वाटली. असंही तो म्हणाला. 

  डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी

  या प्रकरणाबाबत इतर फॉरेन्सिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा एक प्रकारचा सुगावा असू शकतो, परंतु तो पुरावा असू शकत नाही. जो कोणी असा दावा करत आहे त्याचे मूल्यमापन इतर तज्ञांनी केले पाहिजे. यावरून हे कळू शकते की कर्मचारी जे काही बोलत आहे, त्याला ते समजले आहे की नाही. शवागारातील कर्मचारी जर खून आणि आत्महत्या ओळखू शकत असतील, तर डॉक्टर आणि त्यांच्या पदव्यांचा अर्थ काय? दोन वर्षांनी डॉक्टरांना चुकीचे दाखवणे योग्य नाही, असे ते म्हणाले. अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत.