खवले मांजराची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाची कारवाई; 6 जणांना अटक

खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या टोळीतील सात जणांना वनविभागाने चार दिवसांपूर्वी अटक केली होती. या सात जणांच्या चौकशीतून याप्रकरणी आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्या सहा जणांना वन विभागाने अटक केली.

    आंबेगाव : घाेडेगाव (ता. आंबेगाव) येथे खवल्या मांजराची तस्करी करणार्‍या टोळीतील सात जणांना वनविभागाने चार दिवसांपूर्वी अटक केली होती. या सात जणांच्या चौकशीतून याप्रकरणी आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्या सहा जणांना वन विभागाने अटक केली.

    रोहिदास पंढरीनाथ कुळेकर (वय 55), सखाराम बबन मराडे (वय 43, रा. पाभे, ता. खेड), कांताराम सखाराम वाजे (वय 49, रा. भोमाळे, ता. खेड), सागर पुनाजी मेमाणे (वय 31, रा. तळेराण, ता. जुन्नर), जालिंदर कान्छू कशाळे (वय 65, रा. वडेश्वर, ता. मावळ), गीता नंदकुमार जगदाळे (मु. पो. चव्हाणवस्ती, कुमठे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि शांताराम सोमनाथ कुडेकर (वय 32, रा. करंजाळे, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत.

    घोडेगाव येथील जुन्नर फाटा रस्त्यालगतच्या हॉटेलसमोर 13 फेब्रुवारी रोजी खवल्या मांजराची तस्करी करताना वनविभागाने किरण जाधव, धोंडू बाणेरे, नवनाथ चकवे, गणेश कनिंगध्वज, सविता कणसे, सुरेखा धोत्रे आणि गीता जगदाळे या सात जणांना पकडले होते. त्यांच्याकडून एक खवले मांजर, 2 दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना कोठडी देण्यात आली आहे.

    आणखी धागेदाेरे हाती लागण्याची शक्यता

    चौकशीत याप्रकरणी आणखी सहा जणांचा सहभाग असल्याचे समाेर आले आहे. त्यानुसार त्यांनाही वन विभागाने अटक केली. पुणे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, जुन्नर उपवनसंरक्षक अमोल सातपुते, विभागीय वनअधिकारी राम धोत्रे, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, घोडेगाव वनक्षेत्रपाल महेश गारगोटे, प्रदीप रौंधळ यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव सहायक वनसंरक्षक संदेश पाटील व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या सहा जणांच्या चाैकशीतून आणखी बरीच माहिती समाेर येईल असे पथकाचे म्हणणे आहे.