घोरपडीची शिकार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस वन विभागाने पकडले

राधानगरी वन्यजीव विभागाच्या वतीने जंगली भागात गस्त सुरू ठेवली आहे. अभयारण्य परिसरात एका संशयित व्यक्तीला पकडले असून, त्याच्याजवळ घोरपड प्राणी आढळला आहे. संशयित व्यक्ती दुधगंगा वसाहत बाचणी येथील आहे. 

  भोगावती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : राधानगरी वन्यजीव विभागाच्या वतीने जंगली भागात गस्त सुरू ठेवली आहे. अभयारण्य परिसरात एका संशयित व्यक्तीला पकडले असून, त्याच्याजवळ घोरपड प्राणी आढळला आहे. संशयित व्यक्ती दुधगंगा वसाहत बाचणी येथील आहे. राजेनाल डिसोझा असे संशयिताचे नाव असून, वन्य विभागाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  राधानगरी शहर परिसराच्या पश्चिमेकडे दाजीपूर गवा अभयारण्य विस्तीर्ण पसरलेले आहे. या अभयारण्यात गवा, सांबर, ससे, कोंबडे, सालींदर, घोरपड, रानडुक्कर असे प्राणी मोठ्या संख्येने आहेत.

  जंगलातील कोंबडे, ससे, घोरपड या प्राण्यांची चोरटी शिकार मोठ्या प्रमाणात केली जाते. चोरटी शिकार रोखण्यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने गस्ती पथक सुरू केली आहेत.

  वनरक्षक तेजस्विनी पवार, एस एस पाटील, यादव, संजय कांबळे यांच्या पथकाला अभयारण्य परिसरात राजेनाल डिसोझा हा इसम संशयित फिरताना आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेल्या पोत्यात एक मोठी घोरपड हा सरपटणारा प्राणी आढळला. त्याला वन्यजीव विभागाचा खाकी इसका दाखवताच त्याने पोपटासारखे बोलण्यास सुरवात केली.

  केलेला गुन्हा वन विभागाच्या अधिकारी वर्गासमोर कबुल केला आहे. वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

  दाजीपूर, राधानगरी अभयारण्य परिसरात चोरटी शिकार करून कांही प्राण्यांची तस्करी करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. घोरपड प्राण्यांपासून मांस व तेल काढून काही औषधासाठी विक्री केली जाते.

  वन्यजीव विभागाने प्राण्यांची तस्करी करणारे रॅकेट उघडकीस आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.