सिटी-वन या नरभक्षक वाघाला बेशुध्द करून पकडले

वनविभागाने देखील याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करत, जवळपास आठवडा भरापासून वन विभागाच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. आज (गुरुवारी) सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आज सिटी – 1 या नरभक्षक वाघाला अखेर बेशुध्द करून पकडण्यात (catching) वनविभागाला यश आले आहे.

    चंद्रपूर – विदर्भातील भंडारा, चंद्रपुर व गड़चिरोली (Bhandara, Chandrapur and Gadchiroli) या तीन जिल्ह्यामधून तेरा लोकांचे बळी घेणाऱ्या सिटी – 1 या नरभक्षक वाघाला (City one tiger) अखेर बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. चंद्रपुर व गड़चिरोली या तीन जिल्ह्यामधून या वाघाची दहशत होती. शेतात, जंगलात तसेच वस्तीत सुद्धा या वाघाने शिरकाव केल्यामुळं या वाघाने दहशत माजवली होती. त्यामुळं या जिल्ह्यात वाघामुळं लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यामुळं या वाघाबद्दल लोकांनी वनविभागाकडे (Forest dept) तक्रार दाखल केली होती. वनविभागाने देखील याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करत, जवळपास आठवडा भरापासून वन विभागाच्या दोन टीम त्याच्या मागावर होत्या. आज (गुरुवारी) सकाळी झालेल्या या कारवाईने वन विभागासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. आज सिटी – 1 या नरभक्षक वाघाला अखेर बेशुध्द करून पकडण्यात (catching) वनविभागाला यश आले आहे.

    दरम्यान, या वाघाने तेरा लोकांना मारले आहे. याआधी देसाईगंज जवळच्या वळूमाता प्रक्षेत्रातील एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला करून तिला मारले होते. त्यामुळे तो त्या ठिकाणी पुन्हा येणार याची खात्री असल्याने वनविभागाचा ताडोबा येथून बोलावलेला चमू त्याच्यावर पाळत ठेवून होती. जवळच वाघासाठी शिकार म्हणून एक गायही ठेवली होती. त्याप्रमाणे येथे शिकारीसाठी वाघ आला असता, शूटर टीमने त्याच्यावर डार्ट डागला (बेशुद्धीचे इंजेक्शन) देऊन अखेर सापळ्यात अडकवले. या वाघाला आता पिंजऱ्यात बंद करून ठेवले जाणार आहे. अशी माहिती वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिली.