हल्ला प्रकरणात माजी कुलगुरु अशोक प्रधान अनुत्तरीतच

प्रधान यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हल्ला कशा स्वरुपाचा होता. जबाब का दोन वेळा दिला गेला. नक्की त्या दिवशी काय झाले होते, आरोपी शिक्षकाचा काय आरोप होता असे अनेक प्रश्नाची उत्तरे दिली गेली नाही.

    कल्याण : माजी कुलगुरु अशोक प्रधान यांच्यावरील हल्ला प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या हल्ल्या संदर्भात प्रधान यांच्याकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत होती. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही जास्त काही बोलू शकत नाही हे सांगून पत्रकार परिषद आटोपण्यात आली. हल्ला कसा झाला. तुमच्यावर कोणाचा दबाव आहे. दोन दोन तक्रार कशाला असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने पुन्हा एकदा या प्रकरणात जो गुन्हा दाखल झाला आहे. त्या गुन्ह्याचे स्वरुप खरोखर खर आहे का अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.

    कल्याण पश्चिमेतील कर्णीक रोड परिसरात माजी कुलगुरु अशोक प्रधान राहतात. प्रधान हे छत्रपती शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा होते. २०१६ साली ते निवृत्त झाले. काही वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणात एका शिक्षक संजय जाधव यांचे निलंबन करण्यात आले होते. या निलंबनानंतर शिक्षक जाधव याने न्यायालयात दाद मागितली होती. याच दरम्यान त्यानी काही दिवसांपूर्वी प्रधान यांच्या घरी जाऊन चर्चा केली होती. या वेळी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी चोरी केली. प्राणघातक हल्ला केला अशी तक्रार महात्मा फुले पोलिसांकडे दाखल करण्यात आली. आधी एक जबाब दिला गेला. नंतर दुसऱ्या दिवशी दुसरा जबाब दिला गेला. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी संजय जाधव आणि संदेश जाधव या दोघांना अटक केली होती. आधी हे प्रकरण चोरी आणि मारहाणीचे दाखविले गेले. नंतर पाेलिसांनी या प्रकरणात ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला. शहरात या हल्ल्याबाबत उलटसूलट चर्चा सुरु झाली.

    याप्रकरणी प्रधान यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत हल्ला कशा स्वरुपाचा होता. जबाब का दोन वेळा दिला गेला. नक्की त्या दिवशी काय झाले होते, आरोपी शिक्षकाचा काय आरोप होता असे अनेक प्रश्नाची उत्तरे दिली गेली नाही. कारण हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. प्रधान यांनी सांगितले की, पहिल्या दिवसी सहानुभूती पोटी जबाबद दिला गेला. नंतर कळाले समोरची व्यक्ती सहानभूमी दाखविण्याच्या लायकीचा नाही. त्याने जे लोक समोर आणले होते. ते त्यांचे कुटुंबीय नव्हते. हे समजल्यावर मी दुसरा जबाब दिला गेला. या सोबत संस्थेचे सचिन निलेश रेवगडे यांनी देखील प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याचे सांगून काही बोलले नाही. पत्रकार परिषद घेण्याचा काय उद्देश होता. उत्तरे दिली गेली नाही तर पत्रकार परिषद कशाला घेतली. प्रधान यांच्या पत्रकार परिषदेनंतर या गुन्ह्यात लावलेली कलमे खरीच खरी आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक गणेश जाधव देखील उपस्थित होते.