Former corporator of Thackeray group, Abhishek Ghosalkar, was reportedly killed in a financial dispute

    मुंबई : महाराष्ट्रात नेमकं काय चाललंय, काही दिवसांपूर्वीच भाजपचे आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यानंतर आज पुन्हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पैशाच्या वादातून मॉरिस नावाच्या व्यक्तीने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. दहिसर येथे ही घटना घडली असून अभिषेक घोसाळकर यांना करूणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
    मॉरिस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचे बोलले जात आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती असून त्यांच्यावर दहिसरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    राज्यात गुंडांचं सरकार, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
    अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अभिषेक घोसाळकर आताच माझ्यासोबत मातोश्रीवर बैठक करून गेले. आता बातमी आली त्याच्यावर गोळीबार झाला. काय चाललय या राज्यात? गुंड्यांचं सरकार बसलं आहे. एका आमदाराने गोळी घातली, ती पण पोलीस स्टेशनमध्ये. दोन्ही बाजूने गुंडागर्दी चालू आहे, हे सरकार उलथून लावावे लागेल. मिंधेला बदनाम करायची गरज नाही, ते बदनामच आहे, पण त्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय