Former Guardian Minister Ambrishrao Atram's security guard commits suicide by shooting himself

मृत पोलीस जवानांचे नाव हितेश भैसारे (३७) असून ते अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत होते. रुक्मिणी महल येथे कर्तव्य बजावीत असताना कौटुंबिक कलहातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे.

    गडचिरोली : माजी राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. तैनात असलेल्या पोलीस जवानांने सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आज रोज सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास अहेरी येथील ‘रुक्मिणी महल’ या अंब्रिशराव यांच्या बंगल्याच्या परिसरात ही घटना घडली असल्याने एकच खळबळ उडाली.

    मृत पोलीस जवानांचे नाव हितेश भैसारे (३७) असून ते अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात कार्यरत होते. रुक्मिणी महल येथे कर्तव्य बजावीत असताना कौटुंबिक कलहातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करताच जागीच कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने असे टोकाचे पाऊल कौटुंबिक कलहातून असलेल्या चिंतेमुळे त्रासून उचलल्याचे बोलले जात आहे.