
ईडीच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य सत्य आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गृहमंत्री असताना आपल्यावरही दबाव टाकण्यात आला होता. त्यास नकार दिल्याने दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी धाडी टाकल्या होत्या, असा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला.
नागपूर : ईडीच्या भीतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (NCP MLA) भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. हे शरद पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य सत्य आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गृहमंत्री असताना आपल्यावरही दबाव टाकण्यात आला होता. त्यास नकार दिल्याने दुसऱ्याच दिवशी माझ्या घरी धाडी टाकल्या होत्या, असा आरोप अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. देशमुख यांनी दिलीप वळसे पाटील यांचे शरद पवार यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली.
वळसे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करताना देशमुख म्हणाले, आजवर त्यांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादी लढली. 70 च्या वर आमदार निवडून आले. ‘जे अनेक वर्षे शरद पवार यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांनी पवारांबद्दल बोलताना थोडे तारतम्य बाळगले पाहिजे’ असा सल्ला अनिल देशमुख यांनी दिला. दरम्यान, जवळपास सर्वच पराभूत आणि मतदारांसोबत काडीचाही संबंध नसलेल्या नेत्यांना काँग्रेस पक्षाने केंद्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. या नेत्यांमुळे पक्ष आणखीच डबघाईस जाणार असल्याचा दावा माजी आमदार आणि भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख यांनी केला.
केंद्रीय कार्यकारिणीमध्ये मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी मुकुल वासनिक केंद्रीयमंत्री असताना रामटेक लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अविनाश पांडे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. माणिकराव ठाकरे कॉंग्रेसचे प्रदेशध्यक्ष होते. ते स्वत:च्या मतदारसंघातूनही निवडून येऊ शकले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.