राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन; वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके यांचे रविवारी (दि.11) रात्री साडेदहाच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. ते वय ७४ वर्षांचे होते. बेनके हे अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते.

    पुणे : जुन्नर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रय बेनके यांचे रविवारी (दि.11) रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते वय ७४ वर्षांचे होते. बेनके हे अजित पवार गटातील आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जुन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

    वल्लभ बेनके यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातून १९८५ ते २००९ या कालावधीत सलग सहावेळा निवडणूक लढवली होती. त्यातील चार वेळा ते विजयी झाले होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. यामुळे त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत मुलगा अतुल बेनके यांना पुढे केले होते. रविवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पुत्र आमदार अतुल बेनके, डॉ. अमोल, अमित, दोन भाऊ, तीन बहिणी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

    दरम्यान, त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.12) सकाळी ९ ते १२ या वेळेत नारायणगाव येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर ४ वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केला जाणार आहे.