माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा पालिका प्रशासनावर लेटरबॉम्ब, प्रशासनाने निर्णय बदलण्यावरुन व्यक्त केली नाराजी

किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांकडून घेण्यात आलेले निर्णय बदलण्यात येत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी पत्रात केला असून, याबद्दल त्यांनी पत्रात अनेक मुद्दे मांडत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

    मुंबई : सध्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने पालिकेवर सध्या प्रशासन नेमण्यात आला आहे. त्यामुळं महापौर किंवा नगरसेवक कोणीच पालिकेत नाहीत, प्रशासकीय राजवट असल्यामुळं पालिकेतील निर्णय आयुक्त घेत आहेत. यावरच मुंबई माजी महापौर किशोरी पेडणेकर मुंबई महापालिका आयुक्तांवर नाराजीचा सूर उमटला आहे. किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई महापालिका प्रशासनाकडून नगरसेवकांकडून घेण्यात आलेले निर्णय बदलण्यात येत असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी पत्रात केला असून, याबद्दल त्यांनी पत्रात अनेक मुद्दे मांडत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

    दरम्यान, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रात नाराजीचा सूर दाखवत अनेक विषयांना हात घातला आहे. महानगरपालिकेच्या कार्यकाळात महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी घेतलेल्या निर्णयामध्ये फेरफार करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित खात्यांकडून प्रशासकाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याचे कळते. मात्र जोपर्यंत निवडणुका होत नाहीत. आणि महापौर, नगरसेवक, स्थायी समिती  अस्तित्वात येत नाहीत, तोपर्यंत प्रशासकांनी निर्णय घेणे उचित ठरणार नसल्याची खंत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.