Pankaja-Munde

भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई यांची ४ सप्टेंबर पासून शिव शक्ती परिक्रमा सुरू झाली आहे. सुमारे १२ जिल्ह्यात पंकजा मुंडे जाणार असून तेथील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहे. त्याच बरोबर  कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेणार असल्याने त्यांच्या प्रवासा दरम्यान गांवोगावी जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

    वडूज :  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजाताई यांची ४ सप्टेंबर पासून शिव शक्ती परिक्रमा सुरू झाली आहे. सुमारे १२ जिल्ह्यात पंकजा मुंडे जाणार असून तेथील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार आहे. त्याच बरोबर  कार्यकर्त्यांच्याही गाठीभेटी घेणार असल्याने त्यांच्या प्रवासा दरम्यान गांवोगावी जंगी स्वागताची तयारी करण्यात आली आहे.

    श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ४ सप्टेंबरपासून राज्याचा दौरा सुरू केला आहे. ४ तारखेला बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर पासून या दर्शन दौऱ्याला सुरवात झाली असून समारोप ११ तारखेला परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्री होणार आहे. राज्यातील जवळपास बारा जिल्हे आणि चार हजार किमीचा त्या प्रवास करणार आहेत. प्रवासा दरम्यान ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी देखील त्या घेणार आहेत. या परिक्रमेचा  कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून गांवोगावी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी होत आहे.

    पंकजा मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी साडे तीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या रेणुकामातेचे दर्शन घेतले. या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद पहायला मिळाला. प्रचंड उत्साह आणि मोठया प्रतिसादाने त्या भारावून गेल्या. सोमवार दि ४ सप्टेंबर रोजी पंकजा मुंडे छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन शिवशक्ती परिक्रमा सुरू केली आहे.