‘महाराष्ट्रात लवकरच पुन्हा राजकीय भूकंप होईल, एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील’; ‘या’ माजी खासदाराचं भाकीत

शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) भूकंप होईल, असे विधान केले. एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे खैरे म्हणाले.

    संभाजीनगर : शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) भूकंप होईल, असे विधान केले. एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे खैरे म्हणाले. ‘आमची सत्याची बाजू आहे, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंचाच विजय होईल’, असेही खैरेंनी सांगितले.

    चंद्रकांत खैरे म्हणाले, ’16 आमदारांच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार आहे. उद्धव ठाकरे एकदम संयमी नेते आहेत. त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरेंचा विजय झालाच पाहिजे. त्यांचा विजय होईल, असे मी म्हणत नाही. तर त्यांचा विजय झालाच पाहिजे’, असे म्हणतोय. कारण तुम्हाला कसे माहीत? असे विचारले जाईल.

    या निकालाबाबत जेव्हा आम्ही उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश, सगळ्या तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो, यातून असे निघते की, हे 16 आमदार अपात्र ठरणार आहेत’, असे खैरे म्हणाले.