माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचे निधन

नगर दक्षिणचे माजी माजी खासदार व शेवगाव-नेवासाचे माजी आमदार तुकाराम गंगाधर गडाख उर्फ भाऊ (वय ६९ वर्षे) यांचे निधन शुक्रवार (दि. २) रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास निधन झाले.

    शेवगाव : नगर दक्षिणचे माजी माजी खासदार व शेवगाव-नेवासाचे माजी आमदार तुकाराम गंगाधर गडाख उर्फ भाऊ (वय ६९ वर्षे) यांचे निधन शुक्रवार (दि. २) रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास निधन झाले. २००४ ते २००९ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून दक्षिण लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तर १९९० ते १९९५ त्यांनी अपक्ष शेवगाव-नेवासा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मूली असा परिवार आहे. त्यांचा जन्म १ नोव्हेबर १९५३ सालचा आहे.

    शनिवार (दि.३) डिसेंबर रोजी दुपारी नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गडाख यांच्या निधनामुळे नेवासा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एक लढवय्या नेता म्हणून त्यांना राज्यात ओळखले जात होते.

    माजी खासदार तुकाराम पाटील गडाख यांचा धाडसी स्वभाव व कार्यकर्त्यांना संभाळण्याची मोठी ताकद त्यांच्यात असल्यामुळे जीवाभावाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे होते. तुकाराम पाटील गडाख यांच्या निधनाने कार्यकर्त्यांना जीव लावणारा लढवय्या नेता हरपल्याची जनभावना निर्माण झालेली आहे.