manohar joshi

P D Hinduja Hospital

    मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मनोहर जोशी यांच्यावर सध्या मुंबईतील पी. डी. हिंदुजा रुग्णालयात दाखल उपचार सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून आज मनोहज जोशी यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट जारी करण्यात आली आहे. मनोहर जोशी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच त्यांना आता आयसीयूतून बाहेर शिफ्ट करण्यात आले आहे आणि त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे.
    मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. या दरम्यान आज रुग्णालय प्रशासनाकडून मनोहर जोशी यांच्या प्रकृत्तीबद्दल मीडिया स्टेटमेंट जारी करीत त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.