ठाण्याच्या माजी महापौरांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा; शिवसेनेला धक्का

    मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) बंडामुळे (Rebellion) राज्यात सत्तांतर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच शिवसेनेला (Shivsena) ठाण्यात आणखी एक जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के (Thane Mayor) यांनी एक ट्वीट करत एक सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेली ठाणे महापालिका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

    सध्या एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी बंड केले असून ते सध्या गुवाहाटी (Guwahati) येथे आहेत. अनेक आमदारांनी थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. तर, शिंदेंनी आमची शिवसेना (Shivsena) खरी असल्याचा दावा केला असून, काल मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवासस्थान असलेला वर्षा बंगलाही सोडला आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांना अधिक उधाण आले आहे. आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी एकनाथ शिंदेच्या समर्थन करणारे ट्वीट केले आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेल्या ठाणे महापालिका निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

    ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ट्वीट करत आम्ही तुमच्यासोबत… आमची साथ हिंदुत्वाच्या धगधगत्या ज्वाळांना असे म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात होऊ घातलेली ठाणे महापालिका निवडणूक शिंदे यांच्या नेत्तृत्त्वाखाली लढवली जाणार असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. तसेच, शिवसेना बसलेला हा सर्वात मोठा धक्का मानावा लागणार आहे.