
छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या जयघोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत अवघा आसमंत उजाळला. शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. यावर्षीचा चौथा मशाल महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बस स्थानक ते सज्जनगड पालखीतून मिरवणूक, शिंग, तूतारी, हलगी वाद्य शेकडो मशाली मर्दानी आगीचे चित्त थरारक खेळ व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
कास पठार : छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की या जयघोषात व फटाक्यांच्या आतिषबाजीत अवघा आसमंत उजाळला. शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता. यावर्षीचा चौथा मशाल महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची बस स्थानक ते सज्जनगड पालखीतून मिरवणूक, शिंग, तूतारी, हलगी वाद्य शेकडो मशाली मर्दानी आगीचे चित्त थरारक खेळ व छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये अवघा आसमंत उजाळून गेला तर शेकडो धगधगत्या मशालींनी सज्जनगड तेजोमय झाल्याचेच चित्र पाहायला मिळत होते.
रविवारी पहाटे ठीक साडेतीन वाजता मशाल महोत्सवास सुरुवात झाली. यावेळी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त सज्जनगडावर दाखल झाले होते. आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी, एक दिवा शिव समर्थ चरणी या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात अाला हाेता. पहाटे साडेतीन वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. हलगी वादक, पारंपारिक पोशाखातील शिंग, तुतारी वादक, त्या पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची फुलांनी चांदीच्या मखरांनी सजवलेली पालखी, शेकडो युवक, युवती मशाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत किल्ले सज्जनगडावर येत होते.
सज्जनगडावर पालखी दाखल झाल्यावर समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश व रामदासी यांच्या हस्ते पालखीचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली. धाब्याचा मारुती मंदिर, समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिरानजीक मर्दानी खेळ झाले. आकाशात सुरू असलेली फटाक्यांची आतषबाजी व साहसी खेळाने उपस्थित शिवसमर्थ भक्तांची दिवाळीची पहाट शिवमय झाली.
तटबंदीला फुलांची सजावट
मशाल महोत्सवाचे चाैथे वर्ष मोठया उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी गडाच्या तटबंदीला फुलांची सजावट करण्यात आली होती. ही फुलांची सजावट, उभारण्यात आलेले महाराजांचे मोठे फ्लेक्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. फुलांच्या सजावटीमुळे तटबंदीला गतवैभव मिळाल्याचे चित्र दिसत होते.
मावळ्यांचा मोठा सहभाग
आपला सज्जनगड, आपली जबाबदारी या वाक्याखाली रुपरेषा आखून याचा प्रसार मोठ्याप्रमाणावर करण्यात आला हाेता. हा अनुभव याची देही याची डोळा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मावळ्यांनी उपस्थितीती दर्शवली होती.