गोठ्याला लागलेल्या आगीत चार जनावरांचा मृत्यू तर आग विझवताना दोघं जखमी

या घटनेमुळे त्यांच मोठं नुकसान झाले आहे. तर, गोठ्याला घर लागून असल्याने घरातील अनेक वस्तूही आगीच्या भक्षस्थानी सापडल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

    वर्धा : आधीच लम्पी आजारामुळे शेतकऱ्यांना जनावरं गमवाव लागत आहे. अशा परिस्थिती वर्धी जिल्ह्यातील एका शेतकऱ्यावर जनावर गमवायची वेळ आली. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून चार जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून एक लम्पी जखमी झाला . समुद्रपूर तालुक्याच्या रेणकापूर येथे ही घडली आहे.

    शेतकरी आत्माराम निखाडे यांच्या घरी ही घटना घडली. या घटने दरम्यान,गोठ्यातली आग विझवताना  निखाडे आणि त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेमुळे त्यांच मोठं नुकसान झाले आहे. तर, गोठ्याला घर लागून असल्याने घरातील अनेक वस्तूही आगीच्या भक्षस्थानी सापडल्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.