शेतीमालाचे गोडाऊन फोडणाऱ्या चौघांना अटक; दोन लाख ५८ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोरेगाव (Koregaon) शहरातील कृषिभूषण (Krushibhushan) नावाचे शेतीमालाचे गोडाऊन फोडून त्यामधून साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना कोरेगाव पोलिसांनी सापळा रचना अटक (Arrested) केली आहे.

    कोरेगाव : कोरेगाव (Koregaon) शहरातील कृषिभूषण (Krushibhushan) नावाचे शेतीमालाचे गोडाऊन फोडून त्यामधून साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना कोरेगाव पोलिसांनी सापळा रचना अटक (Arrested) केली आहे. कृष्णा धनाजी वाघ, अजय पांडुरंग बाबर, हाईम खलील अन्सारी मंथन शिरसागर (सर्वजण राहणार कोरेगाव, तालुका कोरेगाव) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कोरेगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे (Crime) प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली.

    दिनांक ४ जानेवारी रोजी कोरेगाव शहरातील कृषी भूषण नावाच्या शेती अवजार दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश केला आणि पाच लाख १६ हजार ७०७ किमतीच्या कीटकनाशक औषधाच्या पिशव्या सोडून गेले. यासंदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    कोरेगाव पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकाने घटनास्थळात भेट देऊन तेथील आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केली. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुनाचार्य इसमाने केल्याची निष्पन्न झाले. विशेष पथकाने दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून माहिती घेतली. थोडीच गेलेल्या कीटकनाशक पिशव्यांपैकी दोन लाख ५८ हजार ४०० रुपयांच्या पिशव्या जप्त करण्यात आले आहे.

    या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, पोलीस सचिन साळुंखे, प्रमोद जाधव, समाधान शेडगे, अविनाश गाडगे, अमोल कंस यांनी सहभाग घेतला होता.