sanjay pande

संजय पांडे गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची सीबीआय कोठडी (CBI Custody To Sanjay Pandey) सुनावली आहे.

    मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना अटक केली आहे. संजय पांडे गेल्या काही दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. राष्ट्रीय शेअर बाजार को – लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. आज त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची सीबीआय कोठडी (CBI Custody To Sanjay Pandey) सुनावली आहे.

    कथित को-लोकेशन घोटाळा आणि बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी ईडीने आधीच संजय पांडेंना अटक केली होती. यानंतर आता सीबीआयने संजय पांडेंना अटक केली आहे. पुढील चार दिवस संजय पांडे यांना सीबीआय कोठडीत राहावं लागणार आहे.

    को- लोकेशन सेवेअंतर्गत राष्ट्रीय शेअर बाजारातील दलाल कंपन्यांना आपलं सर्व्हर शेअर बाजार परिसरात उभारण्याची परवानगी दिली जाते. यामुळे ब्रोकर्स शेअर बाजारात सुरू असलेल्या हालचाली सर्वात आधी आणि वेगाने मिळवू शकतात, याचा फायदा दलालांना होतो. अशा प्रकारे अनेक ब्रोकर्संनी बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपये कमावल्याचं तपासात समोर आलं होतं.