Four out of ten students were seriously injured when a truck coming from Chhattisgarh hit a school van parked on the side of the road for puncture repair.

गडचिरोलीत शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यामुळे दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या त्या ट्रकने व्हॅनला  जबर धडक दिली. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. त्या व्हॅनमधील दहा विद्यार्थी जखमी ( ten students injured) झालेले आहेत.

    गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या नवेगाव परिसरात (Navegaon campus) शाळेची बस रस्त्यावर पलटल्याची घटना घडली आहे. या मार्गावर स्कूल व्हॅन आणि ट्रकचा (school van and truck) भीषण अपघात झाला आहे. पंचर झालेली व्हॅन रस्त्याच्या बाजूला उभी होती. ट्रकने व्हॅनला धडक दिली. आणि हा अपघात झालेला आहे. 
    या अपघातात कसलीही जीवितहानी झाली नसून बसमध्ये असलेले विद्यार्थी जखमी झाले आहेत. 
    गडचिरोलीत शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंचर झाल्यामुळे दुरुस्तीसाठी उभी होती. छत्तीसगडहून येणा-या त्या ट्रकने व्हॅनला  जबर धडक दिली. बस रस्त्यावर पलटली तर ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन शिरला. त्या व्हॅनमधील दहा विद्यार्थी जखमी ( ten students injured) झालेले आहेत. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, चार विद्यार्थीची प्रकृती  गंभीर जखमी असल्याचे कळत आहे. तर, उभ्या व्हॅनला धडक दिल्यामुळे ट्रकचालक विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तसेच, त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे.