लाल महाल लावणी प्रकरणी चार जणावर गुन्हा दाखल, तर जितेंद्र आव्हाडांची टिका आणि आवाहन

या प्रकरणी नृत्यागंणा वैष्णवी पाटीलसह चौघावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या लावणी प्रकरणी यावर आता विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराचा विरोध केलाय. त्यांनी एक टिव्ट करुन असा प्रकार पुन्हा घडता कामा नये असं आवाहन केले आहे. तर संभाजी ब्रिगेडने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    पुणे : पुण्यातील लाल महालाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. तसेच हा लाल महाल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या शायस्तेखानाची बोटं याच लाल महालात तोडली होती, त्याच लाल महालात लावणीचं शुटिंग केल्यावरुन सध्या वाद सुरु आहे. हा लावणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणी नृत्यागंणा वैष्णवी पाटीलसह चौघावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या लावणी प्रकरणी यावर आता विविध क्षेत्रातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराचा विरोध केलाय. त्यांनी एक टिव्ट करुन असा प्रकार पुन्हा घडता कामा नये असं आवाहन केले आहे. तर संभाजी ब्रिगेडने मात्र तीव्र आक्षेप नोंदवला असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    दरम्यान, यानंतर आता या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रा गाण्यावर वैष्णवी पाटील डान्स करताना दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिग्दर्शक प्रसाद ओक यांच्या चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा या गाण्यावर एक तरुणी पुण्यातील लाल महालातील मध्यवर्ती ठिकाणी थिरकताना दिसत आहे. पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल मध्ये लावणीचा व्हिडीओ शुट केल्यामुळे याचा विरोध म्हणून अनेक संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. कुलदीप बापट यांनी या संबंधित गाण्याचं शूटिंग केलंय तर डान्सर वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचं समोर आलंय. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये ही लावणी करण्यात आली. त्यामुळं सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत.