वानवडीमध्ये आगीत चार ते पाच घरे जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे आगीचा भडका

साधारणत: साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला. त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते, अचानक धूर आणि अग्नीमुळे नागरिकांना जाग आली.

    पुणे – वानवडी (Wanvadi) गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये रात्री अचानक आग (Fire) लागली. यामध्ये चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) सहा गाड्यांनी एक तासात आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान (Financial Loss) झाले आहे.

    साधारणत: साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान (Accesories Of Stage) ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला. त्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते, अचानक धूर आणि अग्नीमुळे नागरिकांना जाग आली.

    घरातील सिलिंडर घेऊन काही नागरिक आगीच्या ठिकाणापासून दूर पळत सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व सामान, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.