Fraud against women in the name of self-help group, filing a complaint against a finance company

समय मायक्रो फायनान्स कंपनीने महिलांकडून रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली तीनशे रुपये गोळा केले. प्रत्येक महिलेकडे ३५०० रुपये प्रमाणे ६० ते ७० हजार रुपये जमा करून फसवणूक केली. तसेच, राजस्थान मधील अजमेरमध्ये सुद्धा महिलांची फसवणूक केली आहे.

    अकोला : महिलांना बचत गटाच्या माध्यमातून पैशाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयाने फसवणूक करणा-या समय मायक्रो फायनान्स कंपनीविरोधात सिव्हील लाइन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. फिर्यादी वैशाली चंद्रगिरी (रा. गीता नगर, वाशीम बायपास) यांना बचतगटाचे काम करून देतो, असे म्हणून लोकेश अशोक सोनी (वय ५० रा. बस स्टँड जवळ) अकोला याने महिलांना पैशाचे आमिष दाखवून ओळख निर्माण केली.

    समय मायक्रो फायनान्स कंपनीने महिलांकडून रजिस्ट्रेशन फी च्या नावाखाली तीनशे रुपये गोळा केले. प्रत्येक महिलेकडे ३५०० रुपये त्याप्रमाणे ६० ते ७० हजार रुपये जमा करून फसवणूक केली. तसेच, राजस्थान मधील अजमेरमध्ये सुद्धा महिलांची फसवणूक केली आहे. बचतगटाचे पैसे देतो, असे सांगून शेकडो महिलांची फसवणूक करण्यात आलेल्या आरोपीविरोधात सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. ही तक्रार चौकशीत ठेवण्यात आली असून, पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांच्या मार्गदर्शनात पोलीस तपास करीत आहे.