
पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दोन अनोळखी संशयितांनी ‘पोलीस’ असल्याची बतावणी करुन वृध्द महिलेचे १ लाख १४ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेवून फसवणूक केली.
सातारा : पोलीस असल्याचे सांगून वृद्धेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन भामट्यांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर दोन अनोळखी संशयितांनी ‘पोलीस’ असल्याची बतावणी करुन वृध्द महिलेचे १ लाख १४ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या घेवून फसवणूक केली. ही घटना दि. ४ नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी किरण जगदीेश भाटीया (वय ६२, रा. शाहूपुरी, सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना शाहूपुरी ते गेंडामाळ रस्त्यावर घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.