शेतकऱ्यांची फसवणूक; ऊस नेहून पैसे न देता केला अपहार..!

हवेली तालुक्यातील आष्टापुर तसेच इतर गावातील शेतकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांचा ऊस नेहून त्याचे पैसे न देता त्यांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सहा शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, पोलिसांत शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.

    पुणे : हवेली तालुक्यातील आष्टापुर तसेच इतर गावातील शेतकाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांचा ऊस नेहून त्याचे पैसे न देता त्यांची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सहा शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून, पोलिसांत शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे.

    या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात भगवान काळे (वय ५५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश कोतवाल (वय ३४) यांनी तक्रार दिली आहे. २०१८ पासून हा प्रकार सुरू आहे.

    तक्रारदार शेतकरी असून, त्यांचा व इतर पाच शेतकऱ्यांचा ऊस पैसे देतो असे म्हणून नेला होता. पण, अनेक महिन्यानंतर देखील ऊसाचे पैसे न देता त्यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.