गेमिंग ॲप वापरताय? तर सावधान ! गुंतवणुकीच्या नावावर डॉक्टरला 10 लाखांना गंडा

गेमिंग ऍप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवून बक्कळ नफा कमावण्याचे आमिष दाखवून दिल्लीच्या 2 आरोपींनी एका डॉक्टरला 10 लाख रुपयांनी गंडा घातला. बजाजनगर पोलिसांनी डॉ. नितीन काकडे (वय 39, रा. नेहरूनगर, हुडकेश्वर) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    जालना : गेमिंग ऍप्लिकेशनमध्ये पैसे गुंतवून बक्कळ नफा कमावण्याचे आमिष दाखवून दिल्लीच्या 2 आरोपींनी एका डॉक्टरला 10 लाख रुपयांनी गंडा घातला. बजाजनगर पोलिसांनी डॉ. नितीन काकडे (वय 39, रा. नेहरूनगर, हुडकेश्वर) च्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.

    नितीन हे नॅचरोपॅथी डॉक्टर आहेत. 1 सप्टेंबर 2021 रोजी लक्ष्मीनगर येथील सीसीडीत ते आणि लक्ष्मीनगरातील एका हॉटेलमध्ये बसलेले होते. या दरम्यान सोशल मीडियावर सेमिनार असल्याचे सांगितले. त्या सर्च करत असताना त्यांना ओरीस क्वॉईन सेमिनारमध्ये डॉ. काकडे यांना आमंत्रित बाबत माहिती मिळाली. पुढे सर्च केले असता जाहिरात दिसून आली. डॉ. काकडे यांनी जाहिरातीत दिलेल्या मोबाईल नंबरवर साथीदार आरोपी तरूण त्रिखा (46) दोन्ही संपर्क साधला असता आरोपी राहुल खुराणा (रा. दिल्ली) याच्याशी चर्चा झाली.

    आरोपीने गेमिंग ऍप आणि चेन मार्केटिंग संदर्भात माहिती दिली आणि लक्ष्मीनगरातील एका हॉटेलमध्ये सेमिनार असल्याचे सांगितले. त्या सेमिनारमध्ये डॉ. काकडे यांना आमंत्रित केले. उत्सुकतेपोटी डॉ. काकडे हॉटेलमध्ये गेले. यावेळी आरोपी राहुल आणि त्यााच साथीदार तरूण त्रिखा यांनी महिन्याला 20 टक्के लाभ मिळण्याचे आमिष दाखविले.

    तसेच लोकांना जोडल्यास त्याचा वेगळा लाभ मिळेल असे सांगितले. त्यांनी त्वरित तीन लाख रुपये गुंतविले आणि कामाला सुरुवात केली. डॉ. काकडे यांना ऑनलाईन लाभ मिळाला. त्यांनी हळूहळू संपूर्ण जमा पुंजी गुंतविली. लाभाची रक्कम वाढतच गेल्याने त्यांनी नातेवाईकांकडून उसनवारीने घेतलेले पैसेही गुंतविले. पण नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी तक्रार नोंदवली.