सायबर चोरट्यांनी ‘ती’ लिंक पाठवली अन् होत्याच नव्हतं झालं; जाणून घ्या प्रकार नेमका आहे तरी काय?

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. फसवणूक, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार यांसारख्या घटनांची (Crime in Pune) वाढ होत आहे. या सततच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये (Citizen of Pune) दहशत निर्माण झाली आहे.

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune Crime) घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. फसवणूक, खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार यांसारख्या घटनांची (Crime in Pune) वाढ होत आहे. या सततच्या घटनांमुळे पुणेकरांमध्ये (Citizen of Pune) दहशत निर्माण झाली आहे. त्यानंतर आता गुगलवरून कस्टमर केअरचा क्रमांक घेऊन गंडा घालण्यात आला आहे.

    सायबर चोरट्यांनी एका तरुणाला 37 हजाराला गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात 36 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईल धारकावर गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदाराने क्रेडिट कार्डच्या डिलिव्हरीची माहिती घेण्यासाठी संबंधित कंपनीचा ग्राहक क्रमांक गुगलवरून मिळविला. संपर्क केल्यानंतर त्यांना सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली व दोन रुपये चार्ज द्यावा लागेल असे सांगितले.

    …अन् 37 हजार ‘गायब’

    सायबर चोरट्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून 37 हजार रुपये ट्रान्सफर करून त्यांची फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.