
'केरळ टूर' अरेंज करून देण्याच्या नावावर एकाकडून तब्बल 3 लाख 97 लाख रुपये उकळण्यात आले. परंतु, टूर अरेंज करून न देता ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून फसवणूक करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.14) गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
अमरावती : ‘केरळ टूर’ अरेंज करून देण्याच्या नावावर एकाकडून तब्बल 3 लाख 97 लाख रुपये उकळण्यात आले. परंतु, टूर अरेंज करून न देता ती रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवून फसवणूक करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.14) गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी एजंट विशाल विक्रम फडतरे (30, रा. गोपालनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहरातील ख्रिस्त कॉलनी येथील रहिवासी पंकज जामनेकर (40) यांना आपल्या कुटुंबीयांसह केरळ येथे फिरायला जायचे होते. त्यामुळे त्यांनी ओळखीच्या व्ही. के. एस. ट्रॅव्हलरच्या विशाल फडतरे या एजंटशी संपर्क साधला. ऑगस्ट 2023 मध्ये पंकज जामनेकर यांनी स्वतःसह कुटुंबातील सदस्यांची टूरची रक्कम विशाल फडतरे याच्या मोबाईल क्रमांकावर व बँक खात्यात पाठविली.
केरळची टूर अरेंज करतो, अशी बतावणी करून विशाल फडतरे याने पंकज जामनेकर यांच्याकडून एकूण 3 लाख 97 हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतरही त्याने टूर अरेंज करून दिला नाही. त्यामुळे पंकज जामनेकर यांनी विशाल फडतरे याच्याकडे केरळ टूरबाबत वारंवार विचारणा केली. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली.