शिरदाळे येथे जनावरांचे मोफत लसीकरण ; जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे

पशु वैद्यकीय आरोग्य केंद्र धामणी आणि ग्रामपंचायत शिरदाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘लंपी या जनावरांवरील घातक आजारा वरील लसीकरण शिबिर आज शिरदाळे येथे संपन्न झाले.

    लोणी धामणी : पशु वैद्यकीय आरोग्य केंद्र धामणी आणि ग्रामपंचायत शिरदाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘लंपी या जनावरांवरील घातक आजारा वरील लसीकरण शिबिर आज शिरदाळे येथे संपन्न झाले. गावातील सर्व जनावरांचे मोफत लसीकरण यावेळी करण्यात आले. तसेच लसीकरण झाले असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे, असे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश भुरे यांनी सांगितले. या लसीकरणासाठी गावातील ग्रामस्थांनी तसेच मा.सरपंच निवृत्ती तांबे, शंकर तांबे यांनी विशेष सहकार्य केले.

    -तब्बल दोनशे जनावरांचे यात लसीकरण
    ग्रामपंचायतच्या माध्यमातून नेहमी गावकऱ्यांच्या हिताची कामे करण्यावर भर असतो त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्हाला यश आले आहे. तसेच लंपी या आजाराने सगळीकडेच थैमान घातले आहे. तरी शेतकऱ्यांनी देखील खबरदारी म्हणून आपले गोठे स्वछ ठेवावेत तसेच जनावरे चारण्यासाठी गेल्यावर देखील जास्त जनावरे एकत्र येणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच वंदना गणेश तांबे, उपसरपंच मयुर संभाजी सरडे, ग्रा.पं. सदस्य बिपीन चौधरी, सुप्रिया तांबे,जयश्री तांबे यांनी ग्रामस्थांना केले. ग्रामस्थांनी देखील सर्व जनावरांचे लसीकरण करून चांगले सहकार्य डॉक्टर व त्यांच्या कर्मचाऱ्यांना केले. तब्बल दोनशे जनावरांचे यात लसीकरण केले असल्याचे डॉ.राजेंद्र भुरे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत आणि पशु वैद्यकीय आरोग्य केंद्र धामणी यांचे आभार व्यक्त केले.  यावेळी मा.सरपंच निवृत्ती तांबे, शंकर तांबे, बाळासाहेब रणपिसे, तात्याभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर तांबे, सोपान मिंडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

    लंपी या आजाराची सध्या परस्थिती भयानक आहे. संपूर्ण राज्याला याचा धोका निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसात भाद्रपदि पोळा येऊ घातला आहे. त्याच मोठ्या प्रमाणावर आपल्या भागात आयोजन केलं जातं तसेच यावर्षी चालू झालेल्या बैलगाडा शर्यतीमुळे शेतकऱ्यांमध्ये बैलांचा हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे नियोजन झाले होते.परंतु प्रशासनाने या सणवार निर्बंध घातल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर निराशा जरी असली तरी आजाराची दाहकता लक्षात घेता ते गरजेचे असून प्रत्येकाने आपल्या जनावरांची काळजी घ्यावी.

    - मयुर सरडे, उपसरपंच, शिरदाळे