महाराष्ट्रात मुलींना उच्चशिक्षण मोफत; 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचा मात्र निकष

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिकाधिक मुलींना शिक्षित करण्याच्या उद्देशाने 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणात संपूर्ण शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अधिकाधिक मुलींना शिक्षित करण्याच्या उद्देशाने 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणात संपूर्ण शुल्कमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना शुल्कातील ही सवलत संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी दिली जाईल. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कुलगुरूंच्या बैठकीत ही माहिती दिली.

    राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली राजभवनात ही बैठक झाली. राज्यपाल म्हणाले की, महाविद्यालयांनी एकत्र येऊन क्लस्टर युनिव्हर्सिटी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार करण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू आहे. प्रत्येक कुलगुरूंना विद्यापीठांमधील नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आणि त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल पाठवावा लागणार आहे.