आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी फिरता मोफत दवाखाना; भिसे प्रतिष्ठानचे सहाय्य

देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असूूून, यावर्षी रुग्णवाहिका सेवा ही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्या संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कै. रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने जनसेवा हीच ईश्वरसेवा या उद्देशाने प्रेरीत देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखाना ही सुविधा उपलब्ध करुन दिली जात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे (Dr.Vijay Bhise) यांनी दिली.

    संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान आजपासून (दि.20) होणार आहे. देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार असूूून, यावर्षी रुग्णवाहिका सेवा ही पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्या संस्थांना ही औषधांची मदत केली जाणार आहे. या जनसेवेच्या उपक्रमात ज्या दानशूर व्यक्तींना सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉ.विजय भिसे यांच्याशी 9325330624 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

    कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानचे या जनसेवेच्या उपक्रमाचे हे अखंड २२ वे वर्ष असून, या उपक्रमातील पथकात डॉ. आप्पा आटोळे व डॉ. योगेश पाटील (लासुर्णे) राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी दिली आहे.